माळीवाड्यात महालक्ष्मी यात्रा संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) :
मधील माळीवाडा येथील जागृत नवसाला पावणारी लक्ष्मी आई यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.पालखीचे मानकरी भगत पोपटराव(नाना) साठे यांच्या हस्ते प्रवरासंगम येथून कावडीने आणलेले गंगा स्नान झाल्यावर देवीला पंचामृताने अभिषेक झाला दुपारी बारा वाजता.
देवीचे भगत पोपटराव साठे व देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे यांच्या राहते घरापासून देवीच्या पुरातन महालक्ष्मी मुखवटेंची पादुकांची व सुहासिनी कलश मिरवणूक काढण्यात आली , मंदिरात हि मिरवणूक आल्यावर मंदिरातून पालखी मिरवणूक निघाली व परिसरातून तिचे विविध ठिकाणी पूजन करण्यात आले,नंतर पुन्हा पालखी मंदिरात आली व महाप्रसाद संपन्न झाला.
आ संग्राम जगताप, कानिफनाथ भक्त प्रमोद महाराज व त्याचे शिष्य तसेच मंदिराचे पदाधिकारी,समाज बांधव,भाविक मोठ्या संख्नेने मिरवणुकीत सहभागी झाले होते पारंपारिक वाद्यांच्या गजरात पोतराजसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कलशधारी महिला, पोतराज व पालखी सर्वांचे लक्ष वेधले. भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी महालक्ष्मीचा जयघोष केला.
यात्रेला खूप जुनी परंपरा असून, दरवर्षी लक्ष्मीआई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com