विद्यार्थ्यांचा कला, क्रीडा स्पर्धेतील यशांमुळे पाउलबुधे शाळेची वेगळी ओळख - देशमुख नाना
अहमदनगर (प्रतिनिधी) :
स्व.डॉ.ना.ज.पाउलबुधे यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात पुर्ण होत असून कष्टकरी घट कांसाठी व त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संकुल उभारणीचा पाया रचला पालकांनी आपल्या पाल्यांना प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत या संस्थेत प्रवेश घेतला यामधून असंख्य विद्यार्थी घडले. कोणी कलाक्षेत्रात तर कोणी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविले या यशांमुळे पाउलबुधे शाळेची एक वेगळी ओळख विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यात करुन दिली. याचा अभिमान संस्थेला वाटतो, असे प्रतिपादन देखमुख नाना यांनी केले.
डॉ.ना.ज.पाउलबुधे महाविदयालयात राष्ट्रीय खो-खो पट्टू व या शाळेमध्ये प्राथमिक वर्गापासून शिक्षण घेत आज धुळे जिल्हा राज्यक्रीडा मार्गदर्शन अधिकारीपदी निवड झालेली श्वेता गवळी हिचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव देशमुख नाना, प्राचार्य भरत बिडवे, क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. निर्मल थोरात सर, प्रा.आशा गावडे, प्रा. सुनिता त्र्यंबके, प्रा.राजेंद्र मोरे, प्रा. विष्पु मगर, प्रा.रंगनाथ पाटील वाघ, प्रा.दिपक परदेशी प्रा.देवीदास बुधवंत आदींसह अध्यापक, अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. देशमुख नाना म्हणाले कि, विद्यार्थी आमच्या शाळेच्या नावाने ओळखले जात होते. आता विद्यार्थ्यांनी एवढी प्रगती केली कि ते मोठ-मोठ्या पदांवर काम करत आहे. त्यांच्या नावाने शाळेची ओळख होत आहे. हि संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. अशीच एकमेकांची ओळख शाळा व विद्यार्थी करुन देतील असे काम संस्था करीत राहिल असे सांगितले.
प्रास्तविकात प्राचार्य भरत बिडवे म्हणाले खेळात चरित्र आणि चारित्र्य जपले पाहिजे श्वेताला मी लहान मुलीप्रमाणे प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावला महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा उरला नाही कि तिने खो-खो स्पर्धेत भाग घेतला नाही. प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन यश मिळविले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव उंचावले. तिला क्रीडा प्रशिक्षक निर्मल थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे मोलाचे योगदान मिळाले.
सत्काराला उत्तर देताना श्वेता गवळी हिने सांगितले कि, आज मला जे पद मिळाले ते माझे आई , वडील क्रीडा प्रशिक्षक, शाळेचे प्राचार्य संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले या सर्वांचा आशिर्वाद व प्रेरणा मिळाली. मला कोठेही विचारले तर मी पाउलबुधे शाळेची विद्यार्थींनी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. इतके प्रेम या विद्यालयाने मला दिले.
श्वेता गवळी हिची निवड झाल्याबद्दल सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, विश्वस्त रामभाऊ बुचकुल, दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे, डॉ.श्रद्धा पाउलबुधे, रघुनाथ कारमपुरी आदिंनी अभिनंदन केले.
सुत्रसंचालन प्रा.दिपक परदेशी यांनी केले. तर आभार प्रा.आशा गावडे यांनी मानले.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com