श्रावणमासा निम्मित जिव्हेश्वर शिवालय मंदिरात कार्यक्रम संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) |
सावेडी येथील गावडे मळा,पाईपलाईनरोड येथे जिव्हेश्वर शिवालय मंदिरात श्रावण महिन्याच्या निम्मिताने भगवान जिव्हेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले त्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती,
श्री जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळाच्या या मंदिरातील महादेवाच्या पिंडीला पितळी आवरण व नाग देवता तसेच त्रिशूळ यांची प्राणप्रतिष्ठा आणि होम हवन सकाळी सौ.मंगल व राजेंद्र शेडाळे या दांपत्याच्या शुभ हस्ते संपन्न झाले नंतर स्वामी समर्थांचा अनुष्ठांचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद संपन्न झाला
यावेळी सागर मुर्तडकर,संदीप दातरंगे ,सुनील त्र्यबंके, बंटी ढापसे ,कुलदीप भिंगारदिवे,योगेश ठुबे ,सोमनाथ खाडे, अरविंद धिरडे, संजय सागावकर ,अविनाश झिकरे, आयोजक वैभव आहेर,संजय मते, गणेश झिंजे,किरण डफळ ,स्नेहल कौसल्ये, वृषाली भूमकर,रामेश्वरी कांबळे आदींसह मोठ्या संख्नेने भाविक व समाज बांधव उपस्थित होते
मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती तर स्वामी समर्थांची आकर्षक रांगोळी काढण्यात येऊन मंदिर सजवण्यात आले होते , अनुष्ठानाला महिलांची संख्या लक्षणीय होती पिंडीला नागदेवता व त्रिशूल अनावरण केल्यानंतर अजून चैतन्यमय दिसत होती,कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिव्हेश्वर तरुण मंडळ,जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान,स्वकुळसाळी महिला मंच, जिव्हेश्वर भक्त सेवा महिला मंडळ,महिला भजनी मंडळ,युवा कार्यकर्ते, समाज बांधव व मित्र परिवार यांनी प्रयत्न केले मंदिराचे पुजारी व युवक अध्यक्ष वैभव आहेर यांनी सर्वांचे आभार मानले
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com