Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया 

Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया




कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे. 





भारतासाठी स्वप्निलने या 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदक जिंकणारा एकमेव खेळाडू हा बहुमान मिळवला आहे. स्वप्निलच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे.




स्वप्निल कुसाळेने पदक जिंकल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पदक जिंकल्यानंतर खूप आनंदी आहे. मला ज्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत त्या सर्वांचे आभार मानतो. सामन्यात प्रेशरपेक्षा भारतासाठी कायतरी करायचं हेच मनात सुरु होतं. त्यासाठी तशीच मेहनत घेतली. 





माझं लक्ष फक्त ध्येयाकडे होतं.सुरुवातीच्या फेरीचे काही आकडे पाहिले. पण त्यानंतर आकड्यांकडे लक्षच दिलं नाही. मी फक्त ध्येयाकडे फोकस केलं. त्यामुळे कोणत्या पोझिशनला होतो आणि काय झालं याकडे लक्ष नव्हतं. या सामन्यात मला जे काही सर्वोत्तम देता येईल ते दिलं.’, असं स्वप्निल कुसाळे याने जिओ सिनेमाशी बोलताना म्हणाला.





स्वप्निल कुसाळे हा महेंद्रसिंह धोनीचा चाहता आहे. त्यामुळे धोनीचा संदर्भ घेत पत्रकाराने स्वप्निलला प्रश्न विचारला. महेंद्रसिंह धोनीकडून काय प्रेरणा घेतली का? तेव्हा कुसाळेने सांगितलं की, ‘कितीही प्रेशर असलं तरी धोनी मैदानात एकदम शांत असतो. त्याच्याकडून मला प्रेरणा मिळाली. रायफल शूटिंग सामन्यातही मी शांत होतो. माझं लक्ष्य फक्त ध्येयाकडे होतं. महेंद्रसिंह धोनीचा शांतपणा अंगिकारला.