Shendi | शेंडीला महाकाल मंदिराचा देखावा पाहण्यास गर्दी
अहमदनगर । दर्शक :
शेंडी येथील रामराज्य युवा प्रतिष्ठानने भव्य असं उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा सादर केला असून तो पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ गर्दी करत आहेत.
आज देखाव्याला आमदार शिवाजीराव कर्डिले,पिंपळगाव उज्जेनीचे सरपंच भगवान आढाव, शेंडीच्या सरपंच प्रयागा लोंढे,ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे ,माजी उपसरपंच अविनाश शिंदे,चेअरमन संतोष शिंदे,माजी सरपंच बाबासाहेब पडोळे,बाळू देवचक्के आदींनी भेट देऊन देखाव्याचे कौतुक केले आहे.
२० x २० फुटामध्ये हे मंदिर बनवण्यात आले असून ते सर्व स्थानिक मटेरियल वापरून करण्यात आलेले आहे.यामधील पिंडिची लांबी ७ फूट असून उंची ३ फूट आहे,विटा पासून महादेवाचे पिंड तयार केले असून लिंग हे ड्रम वापरून त्यावर तीन किलो एमसील वापरून महाकालचा चेहरा बनवण्यात आलेला आहे.चमकीचा कागद वापरून पिंड सजवण्यात आली आहे.तर भिंती या टाकाऊ पुठ्ठ्यापासून तयार केल्या असून त्यावर कलर करण्यात आला आहे.
हा देखावा प्रशांत जगताप यांनी बनवला असून त्यांना कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. तर तसेच गणेश मूर्ती ही महाराजा रूपातील गणेश असून सर्वत्र मंदिरात अंधुक लाइटिंग असल्याने मंदिर उठून दिसते. ग्रामीण भागामध्ये देखावाची प्रथा अजून नाहीये परंतु शेंडी सारख्या नगर जवळील छोट्या गावाने ही प्रथा चालू केली आहे त्यांचे कौतुक होत आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com