Ahmednagar College | वंचित घटक आणि महिला स्वातंत्र्य आणि सुरक्षा तसेच मोटार वाहन कायद्यातील दुरुस्ती रस्ता सुरक्षा उपाययोजना या विषयावर अहमदनगर महाविद्यालयात व्याख्यान
अहमदनगर : दर्शक ।
अहमदनगर महाविद्यालय अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अहमदनगर शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा .डॉ . आर जे बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली ’वंचित घटक आणि महिला स्वातंत्र्य आणि सुरक्षा तसेच मोटार वाहन कायद्यातील दुरुस्ती रस्ता सुरक्षा उपाययोजना ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती भाग्यश्री का . पाटील सचिव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अहमदनगर म्हणाल्या की, वंचित घटक व महिला यांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा यासंदर्भात महाविद्यालयीन स्तरावर मुलींची होणारे छेडछाड प्रकरणे ,मानवी तस्करीच्या घटना ,मुलींच्या मिसिंग केसेस , बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि त्यामधील तरतुदी यासाठी महाविद्यालयीन स्तरावर सतत प्रबोधन करणार्या कार्यक्रमांचे आयोजन वारंवार करणे आवश्यक आहे.
ज्यामुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींना कायदेविषयक ज्ञान प्राप्त होईल . महाविद्यालय परिसरात फिरणारे अनोळखी वाहने त्याबद्दल पोलिसानां माहीती देणे . सिनेमात काम देतो असल्या फसव्या जाहिराती पासून विशेषात: मुलींची जनजागृती करणे त्यांना या गोष्टी पासून परावृत करणे .बालकांना त्यांच्या हक्का बद्दल जाणीव करून देणे. जेणेकरून भविष्यातील अनेक अनर्थ टाळतील या साठी त्यांची जनजागृती करणे आवश्यक आहे असे मत मांडले .
मोटार वाहन कायद्यातील दुरुस्ती रस्ता सुरक्षा व उपाय योजना या विषयावर बोलताना श्री बाबासाहेब बोरसे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहमदनगर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे, गाडी चालवतांना हेल्मेट घालने, सिट बेल्ट लावणे आवश्यक आहे . कारण या शिवाय अपघाताच्या वेळी एअर बॅग ओपन होतात नाहीत बर्याच वेळा आपण असं पाहता की केवळ सिट बेल्ट न लावल्यामुळे बर्याच जणांना आपले प्राण गमवावे लागतात .बिगर नंबरची गाडी न चालणे ,एक्सीडेंट झाला असता पळून जाणे ,गाडी चालवत असताना गाडी चालवण्याचा परवान (लायसन्स ) सोबत ठेवणे कारण लायसन नसेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या विम्याचे कवच प्राप्त होत नाही . म्हणून रस्ते सुरक्षेचे पालन करत असताना कायद्यातील तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे .कारण नवीन कायद्यामध्ये कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम अतिशय मोठी आहे . त्यामुळे आपण वेळोवेळी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे .असे मत त्यांनी या प्रसंगी मांडले .
याप्रसंगी कायदेविषयक मदत चिकित्सालय केंद्राच्या बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले .या कार्यक्रम प्रसंगी सॅम्युअल गायकवाड उपनिरीक्षक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .डॉ .नोएल पारगे प्रा .डॉ . प्रीतमकुमार बेदरकर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .डॉ .भागवत परकाळ ( विद्यार्थी विकास अधिकारी )यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय (राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक )प्रा . डॉ पोपट सिनारे यांनी केले . तर आभार प्रदर्शन (राष्ट्रीय छात्र सेनेचे समन्वयक ) प्रा .डॉ . कॅप्टन माधव जाधव यांनी केले .
उपप्रचार्य प्रा .दिलीपकुमार भालसिंग ,विनाअनुदान विभाग समन्वयक प्रा .डॉ . सय्यद रज्जक आणि रजिस्टर पीटर चक्रनारायण यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास मंडळ ,राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंमसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com