Ahmednagar College |  अहमदनगर महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त विदेशातील हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यान


Ahmednagar College | देश विदेशात राजभाषा हिंदीचे महत्व वाढत आहे - प्राचार्य डॉ.मिश्रा





अहमदनगर : दर्शक । 

  आधुनिकीकरणात बाजारपेठांचा विस्तार होत आहे. उद्योग व्यावसाय सतत वाढ होत आहे. भारतातील ग्राहकांपर्यत पोहचण्यासाठी हिंदी भाषेबरोबर प्रादेशिक भाषांचाही वापर होत आहे. परिणामी देश विदेशात राजभाषा हिंदीचे महत्व वाढत आहे. कुशल भाषा ज्ञान असणार्‍यांना देश-विदेशात विविध क्षेत्रांमध्ये हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. 


चीन, जपान, रूस, जर्मनी, हंगेरी, फिजी, मॉरिसस इ. विविध देशातील विद्यापीठामध्ये हिंदी भाषेचे अध्ययन-अध्यापन चालु आहे.  हिंदी सिनेमा संपूर्ण जगात पाहिला जातो, त्यामुळे सिनेमा क्षेत्रामध्ये हिंदी भाषेला महत्व प्राप्त झाले आहे. हिंदी भारताची राजभाषा असली तरी ती जनभाषा म्हणून विकसित होत आहे. हिंदी भाषा जाणकारांसाठी विदेशामध्ये एम्बेसी, शिक्षक, मीडिया, सिनेमा, अनुवादक, जाहिरात इ. विविध क्षेत्रांमध्ये व्यावहारिक ज्ञान असणा-यांना खुप संधी आहेत. 



सर्जनशील क्षेत्रांमध्ये कथा, गीत, मालिका, प्रेरणादायी व्याख्यानासाठी हिंदी भाषा जाणकारांसाठी भारताबरोबर विदेशात ही अनेक व्यवसाय व रोजगार निर्माण होत आहे. हिंदी भाषेबरोबर मातृभाषा व विदेशी भाषा अवगत असणा-या विद्यार्थ्यांना विदेशात विविध ठिकाणी रोजगार प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.मुकेश कुमार मिश्रा यांनी केले.



     अहमदनगर महाविद्यालयात  हिंदी दिनानिमित्त आयोजित विदेशातील हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी या विषयावरील व्याख्यानात के.एस.एम.पी.जी. कॉलेज, बस्ती, उत्तर प्रदेश येथील प्राचार्य डॉ.मुकेश कुमार मिश्रा बोलत होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ.ऋचा शर्मा अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.


     याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.प्रीतम बेदरकर, उपप्राचार्य प्रा.दिलीप भालसिंग, उपप्राचार्य डॉ.नावेल पारगे, डॉ.साताप्पा चव्हाण, इतिहास विभागप्रमुख डॉ.विजय कदम, रजिस्ट्रार पीटर चक्रनारायण यांचे सहकार्य लाभले.


     कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक घोरपडे यांनी केले. तर सूत्रसंचालन सिद्धी कुलकर्णी तर आभार वसीम शेख यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.आएशा पठाण, प्रा.जबीन सय्यद, अर्थशास्त्र विभागाचे डॉ.माधव शिंदे, ईटीआय समन्वयक डॉ. गोकुळदास गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तनुजा नलगे, ऋषीकेश धनावडे, साद शेख इ. विद्यार्थ्यांनी मदत केली.