शिवस्वराज्य यात्रेचे डॉ.अनिल आठरे मित्र मंडळाकडून स्वागत
अहमदनगर । दर्शक :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) च्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात शिवराज्य यात्रेचे आगमन झाले आहे.आज नंदनवन लॉन येथे सकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,,खासदार अमोल कोल्हे,खासदार निलेश लंके आदीं उपस्थित होते यावेळी डॉ.अनिल आठरे मित्र मंडळाकडून यात्रेचे स्वागत करून सर्व पदाधिकार्यांचा सन्मान करण्यात आला.
अहमदनगर मधून डॉ आठरे विधानसभा लढविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) इच्छुक असून त्या दृष्टीने त्याची तयारी चालू आहे या यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आठरे यांनी केले होते त्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी नगरकरांचे आभार मानले.
( छाया : महेश कांबळे अहमदनगर )

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com