Ahmednagar College | जल्लोष 2024 जिल्हास्तरीय युवक महोत्सवात अहमदनगर महाविद्यालयाचे यश
अहमदनगर । दर्शक :
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच समाजातील विविध घटकांसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे या उद्देशाने दरवर्षी विविध पातळ्यांवर युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ’जल्लोष 2024 ’ या शीर्षकाने या वर्षीचा युवक महोत्सव सुरू केला.
यात वैयक्तिक सुगम गीत आणि भारतीय स्वर व ताल वाद्य वादन ,भारतीय समूह गायन, भारतीय शास्त्रीय ,उपशास्त्रीय गायन ,पश्चिमात्य वैयक्तिक गीत आणि लोक वाद्यवृंद ,वैयक्तिक नृत्य ,लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य एकपात्री अभिनय आणि नकला ,प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा ,एकांकिका प्रसहन आणि मूक नाटक, मूकनाटक ,स्थळ चित्र आणि चिकट कला ,कात्रण कला ,पोस्टर मेकिंग आणि व्यंगचित्र ,मेहंदी रांगोळी ,माती कला आणि स्थळ छायाचित्र आणि मांडणी कला . या कलाप्रकाराचा समावेश होता .
जिल्हा निहाय विविध महाविद्यालयाचे संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि आपल्या कला कौशल्यात सादर करीत असतात त्यामध्ये ज्यांचे कला कौशल्य उत्तम सादरीकरण उत्तम असते अशांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाते. यावर्षी जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालय युवक महोत्सव जल्लोष 2024 चे आयोजन मालपाणी महाविद्यालय संगमनेर येथे आयोजन करण्यात आले. यात 47 महाविद्यालयातील 2000 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये अहमदनगर महाविद्यालयातील संघाने सहभाग नोंदवत पाश्चात्य समूह गीत (Western group song) या प्रकरात प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये रोझ लालनेयवार, ओबेद लायेमिंगथिंआंग, जेरीमिया रामालियनसांग लावमी, रांगुल ,फ्रान्सिस लालहेनसांग फिमलाहरिट जेफरी लालओझोवाला वार्टेया विद्यार्थी सहभागी होते.
तसेच भारतीय लोकनृत्य (Indian Folk Dance) प्रकारामध्ये ’बांबू नृत्य ’ सादर करून द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये नाभियार श्वेता गोपी, किलोर राजेश्वरी आनंद, भालेराव राजेश्वरी फीलीप, बोरा खुशी नितीन ,केदारी प्रितेश प्रकाश, बेडेकर सिद्धांत ,मिसाळ अजित निलेश, राठोड रोहन बबन आणि पीटर बी लालरिनमावीया यांनी सहभाग घेतला होता. तर वैयक्तीक स्पर्धेमध्ये स्थळ चित्र (Spot Painting)) प्रकारात आदिल शेख याने प्रथम क्रमांक प्राप्त केला .
तर ’पाश्चात्य एकल गायन’ (western Solo) या वैयक्तिक प्रकारामध्ये कु .फिमी हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .जे. बार्नबस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यासाठी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ.सचिन मोरे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा .डॉ भागवत परकाळ , राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा,डॉ.पोपट शिनारे आणि प्रा.गौरव मिसाळ आदींचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमा प्रसंगी उपप्राचार्य प्रा .दिलीप कुमार भालसिंग, विनाअनुदान विभागाचे समन्वयक प्रा.डॉ सय्यद रज्जाक उपप्रचार्य प्रा.डॉ.प्रतिमकुमार बेदरकर, उपप्रचार्य प्रा .डॉ नोयल पारगे आणि रजिस्ट्रार पीटर चक्रनारायण उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com