डॉ.आडकर यांची 109 वी जयंती साजरी
अहमदनगर । दर्शक :
गुरु हा विद्यार्थी वरुन ओळखला जातो, विद्यार्थी हेच शिक्षकांचे अंलकार आहेत. शिक्षक हे विद्यार्थ्यांना दैवतासारखे असतात. तसेच विद्याथीसुद्धा शिक्षकांसाठी दैवत असतात.स्व:तच दु:ख विसरुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात सर्मपित वृत्तीने कार्य करणारे डॉ.आडकरांसारखे मार्गदर्शक समाजात विरळ असतात, अशी भावना पंचाहतरी ओलांडलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.
निमित्त होते जुन्या पिढीतील हिंदी उर्दू भाषेचे प्रकांड पंडित संत नागदेवांच्या रचनावरील भाष्यकार डॉ.शंकर केशन आडकर यांच्या 109 व्या जयंती निमित्त बालिकाश्रमरोड वरील डॉ.आडकर संकुलात माजी विद्यार्थ्यांनी डॉ.शंकर केशव आडकर चारिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित अभिवादन सोहळा संपन्न झाला. 109 च्या जयंती व निवृत्ती नंतर चे 50 वर्षानंतरही डॉ.आडकर यांची विद्यार्थ्यांकडून होणार स्मरण आजच्या काळात कृतज्ञतेचे प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.ऋचा राजीव शर्मा यांनी केले.
पंचाहतरी ओलांडलेले निवृत्त प्राचार्य डॉ.विश्वास काळे, डॉ.सुरेश जैन व श्री बाळकृष्ण सिद्दम या आडकर सरांच्या माजी विद्यार्थ्यांनी आडकर सरांच्या हिंदी विषयाच्या अध्यापन, उर्दू शायरी व त्यांच्या हिंदी साहित्याबद्दल शिकवण्याची त्यांची आगळ्या वेगळ्या पद्धती विषयी शालेय व महाविद्यालयीन जीवनातील त्यांच्या सहवासाच्या विविध जुन्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंंडळाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्रा.रतनलाल सोनाग्रा यांनी डॉ.आडकर यांच्या कष्टाळू व कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्वाचा गौरव करुन नगरचे सानेगुरुजी अशा शब्दात नगर रेडिओला दिलेल्या मुलाखतीत गौरव केला तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. विलास गिते यांनी विविध भाषातील अनुवादनाची प्रेरणा डॉ.आडकर यांनी दिल्याने देशातील विविध भाषेतील जेष्ठ सहित्यिक व अनुवादक यांचा सहवास मिळाल्याचे कृतज्ञाता पुर्वक विविध आठवनींचा मुलाखतीत उजाळ दिला.
स्नेहालयाचे संस्थापक व आडकर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी उर्दु भाषेच्या विकास व संवर्धनासाठी व्यासपीठ उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. स्नेहालयाचे संवर्धक राजीव गुजर यांनी स्वागत केले. आडकर ट्रस्टचे सचिव अशोक कुरापाटी यांनी आभार मानले. भरत कुलकर्णी व संतोष धर्माधिकारी यांनी सुत्रसंचालन केले.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com