Dr.Vikhe Patil College | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीत चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
अहमदनगर । दर्शक :
युवक व युवतींनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना कौशल्यधारात प्रशिक्षण मिळावे यासाठी सरकारने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता प्रशिक्षणांचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी केले आहे.
विळदघाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीत उद्योग स्नेही आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशिष येरेकर, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, जिल्हा उद्योजक केंद्राचे बालाजी बीराजदार, ग्रामोद्योग अधिकारी बी.आर.मुंडे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त निशांत सुर्यवंशी, संस्थेचे प्रभारी सक्रेटरी जनरल डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सालीमठ पुढे म्हणले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना फायदा मिळविण्यासाठी या केंद्राची मदत होणार आहे. ही योजना म्हणजे शिक्षण व कौशल्य यांची सांगड घालणारी योजना आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशिष येरेकर म्हणाले, युवक व युवतींना महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कौशल्य धारीत प्रशिक्षण मिळावे त्याद्वारे त्यांना रोजगार मिळावा व स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा यासाठी राज्य सरकारने महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याद्वारे कुठल्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, या केंद्रात प्रवेश घेण्याची प्रकिया कशी असेल याचे संपूर्ण मार्गदर्शन हे केंद्र करणार आहे.
प्रायार्य डॉ.उदय नाईक म्हणाले, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे एज्युकेशन पॉलीसी 2020 नुसार स्कील हब म्हणून काम करणार आहे. कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 30 याप्रमाणे मुलांची बॅच तयार करुन मुलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच संस्थेसाठी 150 प्रमाणे टार्गेट दिलेले आहे.
संस्थेचे सेक्रेटरी जनरल डॉ. पी. एम. गायकवाड व उपसंचालक सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ. उदय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनाची तयारी करण्यात आली.
या प्रसंगी विभागप्रमुख, इलेक्ट्रीकल इंजि., डॉ. अजित लावरे, समन्वयक यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेची माहिती दिली. आजच्या स्पर्धेच्या युगात युवक युवतींना सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयामध्ये सुरु केलेला हा उपक्रम अतिशय महत्वाची भुमिका बजावणार असल्याचा विश्वास श्री. सुनिल कल्हापुरे यांनी व्यक्त केला.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com