शेंडी, जेऊर मध्ये महाविकास आघाडीला खिंडार
अहमदनगर । दर्शक :
एके काळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा बालेकिल्ला असलेला शेंडी,जेऊर हा भाग होता.परंतु काही युवक वेगवेगळ्या कारणाने महाविकास आघाडीमध्ये गेले होते.ज्यांचे वडील आजोबा आजही आमदार कर्डिलेंबरोबर आहेत.त्यांनी आज महाविकास आघाडीला सोडून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र ससे,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आदेश भगत आदी उपस्थित होते
प्रवेश करणाऱ्या मध्ये संकेत जरे,प्रवीण गुंड,महेश कराळे,विशाल जरे,प्रशांत जरे,योगेश वराळे,शुभम दारकुंडे,वैभव कराळे,सचिन कराळे,बबलू गुंड,केतन त्रिंबके,राहुल गव्हाणे,सचिन जरे,ऋषिकेश पडोळे, भारत पुंडे आदींचा समावेश आहे
यावेळी बोलताना ते म्हणाले आम्ही मोठ्या अपेक्षेने महाविकास आघाडीचे काम केले.त्यांच्यामध्ये सामील झालो पण आमचा भ्रमनिरास झाला तिथे आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही.म्हणून आम्ही आमच्या घरचे ज्यांच्या बरोबर आहेत अशा आमदार कर्डिले याचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणारा असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नगर राहुरी मतदार संघातून शिवाजीराव कर्डिले यांना आमदार करणार हेच आमचे ध्येय आहे.
(छाया : महेश कांबळे अहमदनगर)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com