Savedi | संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद वाटप
अहमदनगर । दर्शक :
सावेडी येथील श्रमिकनगर मधीलसंघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले. गणेश उत्सवानिमित्त प्रतिष्ठान 6 फुटी गणेश मुर्तीची विधीवध पुजा करुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
गणेश उत्सावानिमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने सत्यनारायण महापुजेनिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाआरती व सत्यनारायण पुजेनंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आले. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट 35 वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून प्रत्येक वर्षी ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम व विद्यार्थींना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, यासाठी विविध स्पर्धांचे आयेाजित करण्यात येतात. यावर्षी प्रतिष्ठानच्यावतीने गणेश उत्सवानिमित्त संगीत खुर्ची, लिंबु चमचा, एक मिनिट शो, रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी पाककला तसेच विडी वळवणे स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले.
हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व महिला परिश्रम घेत असतात. 35 वर्षापासून प्रतिष्ठान अनेक उपक्रमात आपले योगदान देत असल्याने नागरीकांकडून विशेष कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com