Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी
अहमदनगर : दर्शक ।
नगर - मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा व ज्योत्स्ना उदयोग केंद्र सोसायटी कार्यशाळा, टिळक रोड, अहमदनगर येथे आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थचे मानद सचिव श्री.पी.डी. कुलकर्णी साहेत तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य माननीय श्री. अविनाश कुलकर्णी साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री. केतन श्रीरसागर साहेब (राष्ट्रवादी युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष) उपस्थित होते. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाळा आणि कार्यशाळेमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सत्कार करण्यांत आला.
अध्यक्ष साहेबांनी आपल्या भाषणामध्ये नगर शहरामध्ये बौध्दिक अक्षम विदयार्थ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी ही संस्था शिक्षक आणि सर्व कर्मचारी मनापासून काम करत आहे. याचा मला अभिमान वाटतो.
कार्यक्रमानंतर विदयार्थ्यांना गोड खावूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश आल्हाट.व भाऊसाहेब कदम.सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती माधवी कुटे यांनी केले तर आभार श्रीमती ज्योती भवारी यांनी मानले.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com