Ahmednagar Skating | संयुक्ता काळेला स्केटिंगचे जिल्हास्तरिय रौप्यपदक
नगर - भिंगार येथील प्रियदर्शनी पाब्लक स्कूलमध्ये झालेल्या अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग चॅपीयनशीप 2024-25 स्पर्धेत टीम् एस् स्पोर्टस् अॅकॅडमी स्केटिंग क्लासची संयुक्ता सचिन काळे हिने रौप्यपदक पटकवले. ती 5 ते 7 या वयोगटात खेळली. ती आय कॉन पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे.
या स्पर्धेतून संयुक्ता काळे हिची महाराष्ट्र स्टेटला निवड झाली असून ही या स्पर्धा लवकरच मुंबईत होणार आहेत. भिंगार येथे झालेल्या स्पर्धा अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सह सचिव सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
तर प्रमोद डोंगरे आणि शुभम कर्पे यांनी या टीमचे प्रशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. संयुक्ता काळे हिचे सर्वत्र काळे विशेष कौतुक होत आहे.
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com