Awards | प्रा.सारिका परदेशी (रघुवंशी) यांना शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान
अहमदनगर । दर्शक
शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशिय संस्था या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार नगरमधील प्रा.सारिका परदेशी (रघुवंशी)याना माउली सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
यावेळी मा कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे,वीरपत्नी शिलाबाई वाघमारे,स्नेहालयाचे डॉ.गिरीष कुलकर्णी,रोटरीचे अध्यक्ष नितीन थाडे ,सुभाष गर्जे,ऋणानुबंधचे अध्यक्ष अजित रोकडे, संभाजीराजे संस्थाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आदी सह नगरकर उपस्थित होते.
प्रा परदेशी या A.E.S. अध्यापक विद्यालय नगर येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात.ऋणानुबंध बहुउद्देशीय संस्थेची उपाध्यक्षा आहे, राष्ट्रसभा पुणे संस्थेचा त्या पुरस्कार प्राप्त आहे.कोरोना काळामध्ये गुगल मीट च्या माध्यमातून ऑनलाइन सकस आहार कसा असावा, आहार, दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्त्व तसेच स्वच्छता जनजागृतीचे कार्य केले.
त्यां गरजू दोन विद्याथ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा पूर्ण खर्च करत आहेत.तसेच विविध शैक्षणिक, पर्यावरण सामाजिक तसेच संगीत क्षेत्रात विविध कार्य त्यांनी केले आहे ,दरवर्षी महिला दिनानिमित्त वंचित घटक असलेल्या महिलांचा सत्कार करणे,मातोश्री वृद्धाश्रमात भेटवस्तूचे वाटप,बालघर मध्ये मुलांना शैक्षणिक वस्तूंची भेट देतात, म्हणून त्यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्या बद्दल त्याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com