डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता

डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता



     नगर - वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. सध्या या महाविद्यालयात डी फार्मसी आणि बी.फार्म अभ्यासक्रम सुरु आहेत.



     फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये फार्माकोलॉजी, फार्मासुटिक्स, फार्मासुटिकल केमिस्ट्री या विषयांना अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणार्यांना फार्माकोलॉजी फार्मासुटिक्स, फार्मासुटिकल केमिस्ट्री या साठी प्रत्येकी 15 सीट आहेत.



 महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध करुन देण्यावर सातत्याने भर दिला. नवनवीन संशोधना साठी लागणार्या प्रयोगशाळा, आधुनिक उपकरणे, उच्च शिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन, सुसज्ज ग्रंथालय आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्याकडे विशेष लक्ष असते. त्यामुळे या कॉलेजमधून अनेक फार्मासिस्ट तयार झाले. या नवीन एम.फॉर्म अभ्यास क्रमाला मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.



     या अभ्यासक्रमाला मान्यता मिळविण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ.श्याम पांगा, सौ.अनुराधा चव्हाण, पीसीआय को-ऑर्डिनेटर डॉ.वेणु कोला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, उपाध्यक्ष रामभाऊ बुचकूल, सचिव नम्रता जगधने, सहसचिव रामकिसन देशमुख, खजीनदार दादासाहेब भोईटे, रघुनाथ कारमपूरी, संचालक साई पाउलबुधे, डॉ.श्रद्धा पाउलबुधे, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा आदींनी अभिनंदन केले आहे.



     एम फार्मसीच्या प्रवेशासाठी तिसर्या फेरीत कॉलेजचे नाव येईल तरी काही माहिती आवश्यक असल्यास किंवा प्रवेशासंदर्भात 9652481252 किंवा 9960529436 यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले.