अलमाटी कझाकिस्तान येथे होणार्या पाच दिवसीय जागतिक परिषदेसाठी नितीन बोठे यांची निवड
नगर - केअर हेल्थ इन्शुरन्सच्या वतीने अलमाटी कझाकिस्तान येथे होणार्या पाच दिवसीय जागतिक परिषदेसाठी अहिल्यानगर येथून हेल्थ प्लॅनर नितीन बोठे यांची निवड झाली. हे परिषद 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या परिषदेसाठी संपूर्ण भारतातून विमा सल्लागारांची निवड करण्यात आली.
त्यामध्ये नगर मधील श्रीराम इन्शुरन्स सर्व्हिसेचे संचालक नितीन बोठे यांची निवड झाली. या परिषदेमध्ये विमा विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी जगभरातून तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. नवीन पॉलिसी ची माहिती कंपनीचे ध्येय धोरणे याबद्दल चर्चासत्र होणार आहे.
या निवडीबद्दल केअर हेल्थ इन्शुरन्स नगर शाखेच्या वतीने नितीन बोठे यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त केअर हेल्थ इन्शुरन्स एरिया हेड राजेश प्रधान, ब्रांच मॅनेजर अनिल थोरात, शिवाजी गांगर्डे, शनीनाथ जगताप, वैभव वाघमारे, ऐश्वर्या कोरडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com