चैत्यभूमी विद्यापीठ मुंबई, येथे,केंद्रीय शिक्षकधम्म प्रशिक्षण या परीक्षेत यश मिळविणार्यांचा सत्कार
नगर - अहमदनगर शहरात प्रथमच आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा तीन महिने वर्षावास मालिकेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीने सिद्धार्थ बुद्धविहार, सिद्धीबाग अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले. यावेळी धम्म देसना देण्यासाठी वरिष्ट केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे गुरुजी, पुण्या येथुन आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. राम गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष आयु.भगवंत गायकवाड व जिल्हा सरचिटणीस राजेंद्र साळवे व महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड होते.
यावेळी चैत्यभूमी विद्यापीठ मुंबई, येथे,केंद्रीय शिक्षकधम्म प्रशिक्षण या परीक्षेत देशात व राज्यात पहिले आलेले प्रा. विजय हुसळे सर,व देशात आठवे व राज्यात दुसरे आलेले, राजेंद्र साळवे साहेब, तसेच देशात नववे व राज्यात तिसरे आलेले प्रा. राम गायकवाड यांचा व नूतन महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड व उपाध्यक्ष अर्चना गायकवाड व कार्यालयीन सचिव सिंधू साळवे व संपूर्ण महिला कार्यकारणी यांचा ट्रॉफी ,शाल, बुके देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माधवराव चाबुकस्वार,सूत्रसंचालन संतोष गायकवाड, शहर सरचिटणीस बनकर बाळासाहेब, तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे,विजय चाबुकस्वार,शेवगाव अध्यक्ष अरुण भोंगळे,रवींद्र कांबळे, काका गायकवाड,अरूण तुपे,बापूसाहेब शिंदे,निलेश भालेराव,मेहेर भिगांरदीवे,संतोष कांबळे,राहुल पायळ,बाबासाहेब डोळस,मोहन शिरसाठ,राहुल पंडागले, दीपक गायकवाड,गोरख केदारे,पवार साहेब,शंकर पंडागळे, भगवान साळवे,भिंगारदिवे,बुध्दार्ष गायकवाड ,तसेच महिला उपासिका रेखा बनकर, तुपे मॅडम, लीला पायाळ,सिंधू गायकवाड, आशा/व रजनी गायकवाड, चाबुकस्वार सोनाली, ताई,प्रिया भालेराव,डोळस ताई,मोना बनकर,अश्विनी जगताप, प्रिया चाबुकस्वार, राणी मोरे, स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी धम्मवान व शीलवान कुटुंब निर्माण होण्यासाठी ’महिला उपासीका शिबिराची’ गरज असल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष प्रा. राम गायकवाड यांनी सांगितले आहे. या शिबिरामध्ये वंदना स्पर्धा, सूत्तपठण स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा या विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवीला. भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव राजेंद्र साळवे साहेबांनी धम्माचा प्रचार व प्रसार जोरात करण्याचा संकल्प केला कांबळे गुरुजीनी कालामसुत या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी खूप मोठया प्रमाणात उपासक उपासिका, जनसमुदाय उपस्थित होता. शहर शाखेने सर्वांचा सन्मान केला व सर्वासाठी अन्नदान व भोजनदान ठेवण्यात आले. महिला उपाध्यक्ष अर्चना गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com