आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


        



नगर - मधील  आठरे पाटील पब्लिक स्कूल या  शाळेमध्ये   मार्च, 1991 ते  2024 पर्यतचे एस. एस. सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व माजी माजी वि‌द्यार्थ्यांचा स्नेहमेळावा डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आला  होतायावेळी  कार्यक्रमासाठी सर्व माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी  व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक-शिक्षिका उपस्थित  होते




     डॉ राहुल धुत व डॉ आठरे  यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्नेहमेळाव्यावे उद्द्घाटन झाले. प्रमुख अतिथीं डॉ. राहुल धूत यांनी अपलया मनोगतात शालेय व्यवस्थापनाचे कौतुक केलेतसेच शाळेत आम्ही कसे घडलोशाळेने आमच्यावर चांगलया प्रकारे संस्कारशिक्षण दिल्यामुळे आम्ही डॉक्टर,इंजिनियरव्यवसायिकवकील व मोठ्या अधिकारी पदावर रुजू झालोतसेच आमचे अनेक मित्र देश विदेशात चांगल्या प्रकारचे कार्य कतृत्व गाजवत आहेतयाचे श्रेय शाळेला व शिक्षकांना दिलेयावेळी अनेक वि‌द्यार्थ्यानी आपली शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलीआणि बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला.




      या  स्नेह मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माजी वि‌द्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात उत्कृष्ट प्रकारची रांगोळीरेड कार्पेटभव्य कमानीमंडपया‌द्वारे सजावट केलेली होतीयावेळी सकाळची प्रार्थनाशालेय मैदानावर प्रमुख अतिथींना अश्वपथकएन.सी.सी.स्काऊट गाईड व हाऊसच्या विद्यार्थ्यांनी बँडपथकाच्या निनादावर कवायत संचालन करून मानवंदना दिली. 





यावेळी घोडेस्वरांनी घोडेस्वारीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करूनविद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आलेहे सर्व पाहून वि‌द्यार्थ्यांचे मन भारावून गेले होते त्यांना त्यांचे बालपणीचे सवंगडी प्रथमच भेटल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होतात्यांच्या मनात शालेय जीवनातील आठवणी जागृत झालया एकमेंकाशी गप्पा गोष्टी करणेविचार विनिमय करणे यामुळे प्रत्येकाला वेगळेच वाटत होतेतसेच त्यांना आपल्या बालपणीच्या वर्गात जाऊन  फोटो घेतले व  सर्व शिक्षकांशी संवाद केला


आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


 


          डॉ. अनिल आठरे पाटील म्हणाले  असा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दरवर्षी आयोजित केला जाईलत्या साठी आपण न चुकता सर्वानी यायचे आहे. तसेच यावेळी शालेय सुविधांचा उपभोग घेण्याचेही आवाहन केलेशालेय मैदानावर माजी विद्यार्थी आणि शाळेतीन वि‌द्यार्थी यांच्यात फुटबॉलचा सामना घेण्यात आलायासाठी माजी वि‌द्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवूनफुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी सर्व माजी वि‌द्यार्थ्यानी शालेय भोजनाचा आस्वाद घेतला




         सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्यकलागीतस्वागतगीतपारंपारिक वेशभूषेत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे  अध्यक्ष डॉ. अनिल आठरे पाटीलकार्यकारी विश्वस्त अॅड. विश्वासरावजी आठरे पाटीलविश्वस्त डॉ.आदिती आठरे पाटीलविश्वस्त मानसिंग आठरे पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.



        स्नेहमेळावा यशस्वीतेसाठी विश्वस्त डॉ. आदिती आठरे पाटीलविश्वस्त मानसिंग आठरे पाटीलमुख्याध्यापकप्राथमिक विभाग प्रमुखसमन्वयकपर्यवेक्षिका व सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.मैदानी क्रीडा प्रकारांचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु.स्नेहल वाघमारे व विद्यार्थी चंद भानुदास व बैरागी अनुष्का यांनी केले व प्रमुख उपस्थितांचे आभार श्री. कुळधरण एम. बी. यांनी मानले. प्रमुख अतिथींचा व मान्यवरांचा परिचय प्राथमिक विभाग प्रमुख सौ. चेंबुरकर मॅडम यांनी करून दिला