अनुश्री पब्बा ठरल्या तोफखान्याच्या बालाजी मंडळाच्या पैठणीच्या मानकरी
नगर-
नवरात्र उत्सवा निमित्त तोफखाना येथील बालाजी मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक सुमित इप्पलपेल्ली यांच्या मार्गदर्शखाली घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर,खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये अनुश्री पब्बा या प्रथम येऊन पैठणीच्या मानकरी ठरल्या त्याना ३२ इंची टीव्ही देण्यात आला.
द्वितीय क्रमांक-फ्रिज,शीतल भट्ट,तृतीय क्रमांक-आटा चक्की,मोना हरबा याशिवाय लकी ड्रॉ मध्ये दिपाली भट्ट व संगीता अरकल यांना बक्षीस मिळाली,आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते ती देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्नेने महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता
आर जे व निवेदक प्रसन्ना जोशी व त्यांच्या टीमने याचे संचालन केले.यावेळी अंबादास इप्पलपल्ली,सुमित इप्पलपेल्ली,वैभव कोटा,कैलास शेरला,ओम लिंगी,भीष्मा श्रीराम,तुषार कुरी,बाळू पागा,वैभव धुळेकर,अजित हरबा,लक्ष दिवटे,रितेश दिवटे,अथर्व कुरी,श्रीकांत मुणगेल,समर्थ कोटा,बंटी पागा,संतोष दोमल,जयदीप इप्पलपेल्ली,अंबादास सब्बन,दीपक कोटा,अमरीश श्रीराम,महिला मंडळच्या ज्योती कोटा,रेणुका पागा,सोनाली सब्बन,शिल्पा दोमल, अश्विनी पागा,भारती लिंगी,अर्चना कुरी,अश्विनी हरबा,ज्योती इप्पलपेल्ली, गोदावरी इप्पलपेल्ली,सपना इप्पलपेल्ली,प्रीती कोटा,गौरी दिवटे,राजलक्ष्मी चिलका श्रुतिका इप्पलपेल्ली,पूजा मुणगेल आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला भगिनींसाठी खास खेळ पैठणीचा ,होम मिनिस्टर कार्यक्रम अभूतपूर्व उत्साही वातावरणात पार पडला. मनोरंजन व प्रश्नमंजुषा व विविध उपक्रमास महिला वर्गांची अलोट गर्दी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभागी नोंदविला.दिलेला टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात स्पर्धा रंगली.उखाणे,रिंग, चेंडू फेकणे, लंगडी,धागा वेचणे अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला.
सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. १६ वर्षांपासून ते ५० वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या. स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांचा पैठणी देऊन गौरव करण्यात आला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मंडळाने प्रयत्न केले

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com