डॉ.आठरे पाटील मंडळाच्या निबंध स्पर्धेचे सोमवारी पारितोषिक वितरण
नगर- डॉ.अनिल आठरे पाटील मित्र मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांतर्गत अहमदनगर शहर हे ऐतिहासिक दृष्ट्या सुप्रसिध्द आहे या शहराला ऐतिहासिक,सामाजिक,सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. सद्यस्थितीत अहमदनगर हे शहर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक,औद्योगिक व सर्वांगीण विकासात्मक दृष्ट्या विकसित नाही याची खंत नागरिकांच्या मनात होती,
त्यामुळे त्यांचे विकासाचे स्वप्न आणि संकल्पना कुठेतरी समाजाच्यापुढे येण्याच्या उद्देशाने डॉ.अनिल आठरे पाटील मित्र मंडळाच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेचे विषय होते माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर , माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग या विषयावर शहरातील नागरिकांनी आपल्या मनातील भावना,संकल्पना निबंधात लिहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना अनुक्रमे स्मृतिचिन्हे, रोख स्वरुपात बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण सोमवार दि १४ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.
अशा उत्कृष्ट निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ सामाजिक विषयाचा अचूक वेध घेणारे थोर साहित्यिक, प्रसिद्ध लेखक, सुप्रसिद्ध व्याख्याते आणि हास्य सम्राट डॉ.संजय कळमकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी डॉ. कळम्कर मार्गदर्शन करणार आहेत, सदर निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी व अहमदनगर शहरातील नागरिकांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी सोमवार दिनांक 14/10/2024 रोजी आठरे पाटील पब्लिक स्कूल,सावेडी,वडगांव गुप्ता रोड,अहमदनगर च्या प्रांगणात सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
सर्व स्पर्धकांना निमंत्रण देण्यात आले असून, सदर निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी व अहमदनगर शहरातील नागरिकांनी आवर्जून पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे डॉ.अनिल आठरे पाटील मित्र मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com