Top News

एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही

 एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही 

एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही




मुंबई । दि २१/११/२०२४ : 


खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरु झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे गट शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे. तर भाजपाकडून या दाव्यावर अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री भाजपचा होणार असे स्पष्ट संकेत बैठकीत देण्यात आल्याने नेमके एकनाथ शिंदे नाराज झाले का दिल्लीत दबावतंत्र वापरण्यात आले का दरम्यान काल (दि. २८ नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याची बातमी समोर येत आहे. 





मुंबईत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींवर सोपविल्यानंतर शिवसेनेकडून (शिंदे) गृहमंत्री पदावर दावा केला जात असल्याची माहिती समजते परंतु अचानक मुळगावी जाणे हे निवडणुकीचा थकवा मिटवण्यासाठी तर नाही कारण एवढा महत्वाचा निर्णय आणि सत्ता स्थापनेच्या कालावधीत अचानक दिल्लीत काय घडले कोण जाणे याबद्दल लवकरच आपल्याला कळेल.


  




 मी सगळ्यांची काळजी घेतो आहे : एकनाथ शिंदें


दिल्लीतील बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सूचक व्यक्तव्य केले होते. अमित शाह यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक बैठक झाल्याचे त्यांनी म्हटले. “मुंबईत भाजपाची बैठक होईल. त्यानंतर पुढील निर्णय होईल. दिल्लीतली आमची बैठक सकारात्मक झाली. 



अमित शाह, जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. माझी भूमिका मी जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. डेडलॉक संपला आहे. सगळे काही व्यवस्थित आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे” असे एकनाथ शिंदेंनी म्हटले होते.



आज मुंबईत बैठक होईल, अशी माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनीच दिली होती, त्यानंतरही ते सातारा येथे असल्याची माहिती  मिळत असल्याने मोठा राजकीय भूकंप होतो कि काय अशी शंका निर्माण झाली आहे 


---------------------------------------------

Key Maharashtra Meeting Cancelled, Eknath Shinde Heads To Village: Key Points



CM पर फंसा पेच! महायुति की आज होने वाली बैठक रद्द, अचानक अपने गांव चले गए एकनाथ शिंदे 

काल दिल्लीत माध्यमांशी काय बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم