आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आंतरशालेय क्राॅस कंट्री स्पर्धा संपन्न
नगर-सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेत आंतरशालेय क्राॅस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वीचे ४५५ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या स्पर्धेचा प्रारंभ शाळेचे मुख्याध्यापक,समन्वयक आणि प्राथमिकच्या विभाग प्रमुख यांनी ध्वज दाखवून केला.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ५ कि.मी. तर विद्यार्थिनींनी ४ कि.मी. अंतर धावून यशस्वीपणे पूर्ण केले.
इयत्ता ८ वी ते १० वी या गटात चंद भानुदास याने प्रथम क्रमांक,पानसंबळ यश द्वितीय व थोरात अभय याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता ५ वी ते ७ वी या गटात सिंग आदित्य प्रथम, गलांडेओम द्वितीय व कर्पे ऋत्विक याने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थिनींमध्ये बिडलान इशिका प्रथम,मुसावत निकिता द्वितीय तर काळे वेदांती हिने तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक ,प्राथमिकच्या विभाग प्रमुख ,पर्यवेक्षिका व समन्वयक यांच्या हस्ते सुवर्ण,रजत,कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी क्रीडा खेळाडूंचे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ.अनिल आठरे पाटील,कार्यकारी विश्वस्त ॲड.विश्वासराव आठरे पाटील व सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप दरंदले आणि सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com