कार्तिक पौर्णिमाला सावेडीतील अय्यप्पा मंदिरात भाविकांची दर्शनाला गर्दी
नगर-सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात कार्तिक पौर्णिमे निम्मित भाविकांनी दिवसभर दर्शनास गर्दी केली होती तर संध्याकाळ पासून दर्शनाला रांग लागली होती
दक्षिण भारतीयासह महारास्त्रातील भाविकाची श्रद्धा असलेले अय्यप्पाचे मंदिर केरळ मधील शबरीमळा येथे आहे, कार्तिक पौर्णिमेला नगरमधील भाविक दरवर्षी दर्शनाला मोठी गर्दी करतात यावेळी अनेकांनी देवास मोरपीस वाहिले भगवान कार्तिकेय आणि भगवान अयप्पा एकच आहेत अशी काही जनाची श्रद्धा आहे पण शिव कुळातील दोघेही असून भाऊ आहेत अशी माहिती येथील पुजारीनी दिली
ते म्हणाले सर्वशक्तिमान भगवान कार्तिकेय हा अजिंक्य राक्षस तारकासुरला मारण्यासाठी जन्मलेला शिवशक्तीचा पुत्र आहे आणि भगवान अय्यपा स्वामींचा जन्म भगवान महादेव आणि देवी मोहिनी(भगवान नारायणाचा अवतार)यांच्यापासून झाला आहे भगवान नारायणाचा अवतार एक शक्तिशाली भयानक राक्षस महिषीला मारण्यासाठी जन्माला आले म्हणजे वाईटाला मारण्यासाठी जन्माला आलेला आहे. महाराष्ट्रात महिला कार्तिकेय स्वामींची पूजा फक्त कार्तिक पौर्णिमेला करतात पण दक्षिण भारतात रोज महिला कार्तिक स्वामींची पूजा करतात. नगरमधील महिला भाविक कार्तिक स्वामींचा भाऊ म्हणून आज दर्शनाला येतात
पौर्णिमा निम्मित संध्या ७ वा दीपआराधना करण्यात आली ,नंतर देवाची आरती व पुष्पभिषेक करण्यात आला व भाविकांना महाप्रसाद(गोड जेवण) देण्यात आला यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. सध्या मकर विल्लकु हा ६० दिवसाचा उत्सव चालू असून रोज भाविकांच्या वतीने संध्याकाळी महाप्रसाद चालू आहे तर दर शनिवारी व रविवारी या ठिकाणी महाप्रसाद होत असतो त्यासाठी कोणीही भाविक योगदान देऊ शकतात

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com