Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या 'रुस्तुम ए हिंद' सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे
सिकंदर रुस्तम-ए-हिंद किताब मिळवणारा मूळचा सोलापूरचा आहे पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातील जाण्दला येथे 'रुस्तुमे-हिंद' या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत देशभरातील नामवंत आणि दिग्गज असे प्रसिद्ध मल्ल आणि विविध किताब आणि गदा पटकविणारे पैलवान यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
रुस्तुम ए हिंद हा कुस्ती मधला भारतातील अत्यंत मानाचा किताब असा मानला जातो हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा पहिलवान सिकंदर शेख हा ठरला आहे अत्यंत चित्त थरारक आणि चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत सिकंदरने अत्यंत प्रभावीपणे कुस्तीचे पैलू दाखवत बघा कोहलीला आसमान दाखविले आणि रुस्तुम ए हिंद हा मानाचा किताब पटकावला.
सिकंदरला रुस्तुम ए हिंद किताबात मानाची गदा एक ट्रॅक्टर आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून आयोजकांकडून देण्यात आले महाराष्ट्रातील हरीशचंद्र बिराजदार असाब अहमद आणि बुचडे अमोल या तीन मल्लांनी यापूर्वी हा किताब जिंकला होता आता सिकंदर शेख हा किताब जिंकणारा महाराष्ट्राचा चौथा मल्ल ठरला आहे महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांकडून या मिळवलेल्या यशाबद्दल सिकंदर चे अभिनंदन होत आहे.
रुस्तुम ए हिंद या किताबावर उत्तर भारतीय पहिलवान वर्चस्व गाजवत असतात मात्र सिकंदरने हा किताब जिंकून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला आहे. मागील दोन-तीन वर्षापासून महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात एका हमालाचा पोरगा कुस्तीचा सिकंदर म्हणून प्रसिद्ध झाला आणि रुस्तुम ए हिंद हा किताब मिळविला.
पुणे येथील फुलगाव मध्ये झालेल्या 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदरने शिवराज वर झोळी डाव टाकत चितपटीने विजय मिळवून महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला होता.
बलदंड शरीर पुरेपूर उंची डावपेच लवचिकता आणि आक्रमकता असे सर्व गुण संपन्न सिकंदरला ज्ञात असून प्रतिस्पर्धी पैलवान चढवण्याआधीच त्याला चित्रपट करण्याची कला सिकंदरपाशी आहे.
सिंकन्दरच्या वडिलांची अत्यन्त गरिबी आणि हलाखीची परिस्थिती होती परंतु त्यांच्या आजोबांमुळे कुस्तीचा वारसा होताच सिकंदरचे वडील रशीद हे कुटुंब पालन पोषण करण्यासाठी हमाली करायचे आणि मुलांना घेउन आखाड्यात कुस्तीसाठीही जायचे आणि सराव करायचे दोन मुलांपैकी सिकंदरने हि कला लवकर आत्मसात केली आणि रुस्तुम ए हिंद 'किताब मिळवत आमचे स्वप्न पूर्ण केल्याचे ते म्हणाले.
सिकंदरच्या वडिलांनी ज्या खांद्यावर हमाली करत पोती वाहिली त्या खांद्यावर रुस्तम- -ए-हिंद मानाची गदा ठेवत वडिलांना मान दिले.
अशा या महाराष्ट्राचा नाव भारतात गाजविणाऱ्या सिकंदरला मानाचा सलाम !
संपूर्ण देशात सिकंदरने कुस्ती लढत अनेक बक्षिसे मिळवली त्यापैकी 25 बुलेट तीन ट्रॅक्टर, दोन महिंद्रा थार, पाच अल्टो कार, सात टीव्हीएस, सात स्प्लेंडर दुचाकी, तर 50 च्यावर चांदीच्या गदा जिंकल्या आहेत.






टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com