Ahmednagar College | डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा महापरिनिर्वाण दिन अहमदनगर महाविद्यालयात आयोजित
नगर- अहमदनगर महाविद्यालयात डी. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानत्रतावादी दृष्टीकोन भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक", असे उदार अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. जे. बार्नवस यांनी केले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. नोएल पारगे, उपप्राचार्य डॉ. रज्जाक सय्यद, उपप्राचार्य डॉ. दिलीपकुमार भालसिंग, उपप्राचार्य डॉ. प्रीतम बेदरकर यांच्या सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी अद्वेता सुद्रिक, साक्षी भोसले, श्रेया घोरपडे व रिया तिवारी या विद्यार्थिनींनी आपले मनोगत मांडले. डी. निमिषा बंडेलू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, डी. सचिन मोरे, डी. पोपट सिनारे, प्रा. लक्ष्मीप्रभा उपाडे व प्रा. आनंद रायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com