स्नेह 75 च्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त अक्षयचा सन्मान
नगर - समाजात दिव्यांग व्यक्तींना केवळ दयापात्र न मानता त्यांच्या प्रति एक नवा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी दिव्यांगत्वाला सामर्थ्याचे आणि योगदानाचे कोंदण देण्याची संधी दिली तर ते अंधारातही आशेचा प्रकाश निर्माण करतील. दिव्यांग व्यक्तींनी कला, विज्ञान, क्रीडा, तंत्रज्ञान यासारख्या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे.
त्यांच्या या योगदानाची दखल समाजाने घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली तर त्यांची क्षमता वेगळी उमटेल. दिव्यांग हे माता-पिता यांचे गॉड गिफ्ट आहेत. त्यांना मदतीपेक्षा आदर, समानता, आणि स्वावलंबनाची संधी हवी आहे. असे प्रतिपादन सुमन वैद्य यांनी केले.
सावेडी मध्ये स्नेह 75 ग्रुपच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त अक्षय सुनील वैद्य याचा सन्मान केला.या युवकाने आपल्या दिव्यांगा ची लाज न बाळगता एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण करून बँकेत नोकरी मिळवली. चित्रकला, स्विमिंग स्पर्धा यामध्ये 800 ते 900 बक्षिसे मिळवली. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त केला अशा या कर्तबगार युवकाचा सन्मान करून त्याला आर्थिक मदत स्नेह 75 च्या वतीने देण्यात आली.
प्रास्तविक करताना किशोर रेणावीकर म्हणाले की स्नेह 75 या ग्रुपने आत्तापर्यंत समाजात विविध स्तरावर काम करताना सामाजिक भावना जोपासत ज्यांनी यश मिळविले अहिल्या नगरचे नाव उंचाविले अशांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन मदतीचा हात दिला आहे आजही दिव्यांग दिनानिमित्त अक्षय वैद्य याने दिव्यांगांवर मात करून बँकेत नोकरी करीत विविध स्पर्धेत यश मिळवले त्याला प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा आज सन्मान केला आहे.
या सन्मानाला उत्तर देताना अक्षय म्हणाला जन्मताच मला हात व पाय यांचे दिव्यांग होते. पण आई-वडिलांनी मला त्याची जाणीव होऊ दिली नाही. मला स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. मी पदवीधर होऊन बँकेत नोकरीला लागलो चित्रकला, स्विमिंग स्पर्धेत बक्षिसे मिळवली स्विमिंग स्पर्धेत 35 मेडल पटकाविले 3 डिसेंबर २०१४ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते माझा सन्मान झाला ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com