Kotwali Police Nagar | क्रियाशील आरोपींची माहिती अद्यावत ठेवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे : पो.नि.दराडे

Kotwali Police Nagar | क्रियाशील आरोपींची माहिती अद्यावत ठेवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे : पो.नि.दराडे




नगर - पाेलिसांनी पाेलीस ठाणे हद्दीत घडणारे मालमत्तेविषयी गुन्ह्याची माहिती घेऊन तपास अधिकारी यांच्या मदतीने उघडकीस आणावे. घडलेल्या गुन्ह्यात आराेपींना तात्काळ ताब्यात घेऊन याेग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच पाेलिस ठाण्यात आलेल्या फिर्यादी व तक्रारदार यांच्याशी साैजन्याने वागावे असे आदेश काेतवाली पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सर्व पाेलिस अंमलदारांना दिले आहेत.



काेतवाली पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांची तातडीने उकल व्हावी यासाठी पाे. नि. दराडे यांनी गुन्हे शाेध पथकाची (डी.बी.) फेररचना केली आहे. या संदर्भात पाेलिस अंमलदारांना कामकाजाबाबत त्यांनी 


विविध सूचना दिल्या आहेत. अवैध धंद्याची माहिती घेऊन छापे टाकून अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करावे. पाेलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा व रात्री नियमित पेट्राेलिंग करावी.पेट्राेलिंगसाठी रवाना हाेताना व पेट्राेलिंग झाल्यानंतर पेट्राेलिंग दरम्यान काय कारवाई केली याबाबत सविस्तर स्टेशन डायरीला नाेंद घ्यावी. 


यासह पाेलीस ठाणे हददीतील क्रियाशिल आराेपी तसेच माहितगार आराेपीची माहिती अदयावत ठेवून त्यांना पेट्राेलिंग दरम्यान चेक करुन त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून गंभीर गुन्हा घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

 

वारंवार गुन्हे करणाऱ्या आराेपींवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करावी. अवैध शस्त्र बाळगणारे, वापर करणारे, यांचा शाेध घेऊन त्यांचेवर प्रभावी कारवाई करावी. जामिनपात्र व अजामिनपात्र वारंन्ट तसेच महत्वाचे समंन्सची बजावणी बाबत स्वतंत्र पथक आठवडयातुन दाेन-तिन वेळा तयार करुन त्यांचे करवी बजावणी करावी. अशा अनेक सूचना दिल्या. तसेच पाेलिसानी कामकाज करीत असतांना नागरीकांशी साैजन्याने वागावे तसेचत्यांच्याकडे काेणत्याही प्रकारे लाचची मागणी करु नये अशा सक्त सूचना पाे.नि. दराडे यांनी दिल्या आहेत. 


नव्याने फेररचना केलेल्या गुन्हे शाेध पथकात पाेलिस हवालदार याेगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, संदिप पितळे, सलिम शेख, महिला पाेलिस नाईक संगिता बडे,पाेलिस काॅन्स्टेबल अभय कदम, पाेलिस काॅन्स्टेबल अमाेल गाडे, सुरज कदम, पाेलिस काॅन्स्टेबल अतुल काजळे, पाेलिस काॅन्स्टेबल दिपक राेहकले, तान्हाजी पवार, सचिन लाेळगे,सतिष शिंदे, सत्यजित शिंदे, सुजय हिवाळे या पाेलीस अंमलदारांचा समावेश आहे.