नगरच्या रोहित मारुती भोरेचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण
नगर- ध्येय जर निश्चित असेल तर माणूस आपली स्वप्ने सहज पूर्ण करू शकतो हे नगरमधील रोहित मारुती भोरे याने दाखवून दिले. भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्नं त्याने पूर्ण केले आहे. त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए च्या 147 कोर्स मधून रोहित याने 3 वर्षाचे खडतर असे प्रशिक्षण यशस्वी पणे पूर्ण केले. आता तो पुढील प्रशिक्षणासाठी लवकरच राष्ट्रीय नेवल प्रबोधिनी अर्थात INA मध्ये जाणार आहे.
नगरच्या रोहित मारुती भोरे याने आठवी मध्ये असताना देशसेवेसाठी भारतीय नौदलात जाण्याचे ठरवले होते.त्या दृष्टीने त्याने प्रवास सुरू केला.
रोहित ने पहीली ते दहावी शिक्षण केंद्रीय विद्यालय नगर येथे घेतले. त्यानंतर थेट छत्रपती संभाजी नगर गाठून सर्व्हिसेस प्रीपेटअरी इन्स्टिटय़ुट अर्थात SPI मधून बारावीचे शिक्षण घेतले. त्याच सोबत एनडीए प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू केली.
शिक्षकाचे मिळालेले योग्य मार्गदर्शन, कुटुंबियांचा आधार आणि मेहनतीच्या जोरावर रोहित याने अवघड अशी एनडीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून एनडीए मध्ये प्रवेश मिळवला.
घरातूनच त्याला लष्कराचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. त्याचे वडील मारुती भोरे हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत, व ते सध्या पोलीस दलात इन्स्पेक्टर या पदावर नागपूर येथे कार्यरत असून आई गृहिणी आहेत. त्याच्या यशात आईचा मोलाचा वाटा आहे. रोहितने सिद्ध करून दाखवले की ध्येय निश्चित असेल तर यश मिळतेच आणि त्याने एनडीए मधील खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केले.
गौरवास्पद सेवेत आल्याचा आनंद देशासाठी प्रतेक माणूस आपआपल्या पद्धतीने देशसेवा करत असतो. पण मला वडीला प्रमाणे भारतीय नौदलाच्या माध्यमातुन देशसेवा करता येणार आहे. याचा आनंद आणि अभिमान आहे. एनडीए मध्ये येण्यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात मात्र खूप कमी विद्यार्थ्याला यश मिळते. त्यासाठी शाळेत असताना तुम्हाला तयारी सुरू करावी लागेल. विशेषत: गणित, भौतिकशास्त्र याचा अभ्यास पक्का करा आणि देशसेवेच्या सर्वात गौरवास्पद सेवेत या. असे रोहित याने सागितले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com