अहमदनगर महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विशेष परिसंवाद
नगर - डॉ. बी. पी. हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर कनिष्ठ महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादासाठी प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर (उपप्राचार्य व मानसशास्त्र विभाग प्रमुख अहमदनगर महाविद्यालय) व डॉ. शीतल शिंदे (आहारतज्ज्ञ - बूथ हॉस्पिटल) यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते.
सर्वप्रथम पाहुण्यांचा परिचय प्रा. संतोष कांबळे व डॉ. रूपाली नाथ यांनी करून दिला. याप्रसंगी पाहुण्यांचा सत्कार उपप्राचार्य प्रा. प्रतुल कसोटे व पर्यवेक्षिका श्रीमती उज्वला गायकवाड यांनी केला.
यानंतर उपप्राचार्य प्रा. प्रतुल कसोटे यांनी परिसंवादाचा उद्देश सांगत असताना विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये यश संपादन करताना अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची असणारी आवश्यकता याबद्दल आपले विचार मांडले.
प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जीवनातील आदर्श माने कोणती असावीत, स्व ओळख निर्मिती कशी करावी, आलेल्या संधीचे सोने कसे करावे, आयुष्यात निर्माण होणाऱ्या ताणावर कशी मात करावी, संकटाच्या वेळी मानसिक स्वास्थ्य कसे राखता येईल अशा अनेक विषयांवर विदयार्थ्यांशी संवाद साधला.
डॉ. शितल शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना समतोल आहाराची आवश्यकता, निद्रेचे महत्व, अपुऱ्या झोपेमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम, व्यायामाची आवश्यकता, किशोरावस्थेतील लसीकरण, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले. तर प्रा. केतन औटी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
x

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com