Top News

Insurance | स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अभिजित बकोरे ग्रूपचे 12 कोटींचे क्लेम वाटप

 Insurance |  स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अभिजित बकोरे ग्रूपचे 12 कोटींचे क्लेम वाटप

Insurance |  स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अभिजित बकोरे ग्रूपचे 12 कोटींचे क्लेम वाटप




नगर -आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य विमा कंपनी असलेली स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या शहरात कार्यरत अभिजीत बकोरे यांच्या ग्रुपने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली. याबद्दल या ग्रुपचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. बकोरे ग्रुपने वर्षभरात ग्राहक संख्येचा उच्चांक करीत स्टार हेल्थ कंपनीच्या ग्राहकांना महाराष्ट्रात बारा कोटी रुपयाहून अधिक रकमेचे क्लेम वाटप केले.


ग्रुपचे 150 हून अधिक प्रतिनिधी जिल्ह्यात कार्यरत आहेत. बकोरे ग्रुपच्या टीमने याआधीही जिल्हाभरात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. यावर्षी ग्रुपमध्ये दहा क्लब मेंबरही झाले आहेत. या टीमचे सिनियर सेल्स मॅनेजर अभिजित बकोरे यांनी व्यवसायाची योग्य व्यवस्थापन ग्राहकांचा विश्‍वास व प्रतिनिधींच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले असल्याचे सांगितले.


या प्रसंगी संदीप टेके, संजय मनवेलिकर, नवनाथ कर्डीले, संतोष होळकर,विकास वाळुंज, सतीश कासार, प्रसाद बानकर या विमा प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले. 


या प्रसंगी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मा . झोनल मॅनेजर विक्रांत कायगावकर , मा. एरिया मॅनेजर रणजीत उजागरे  यांनी सर्व प्रतिनिधींचे मार्गदर्शन व कौतुक केले. सर्व विमा प्रतिनिधींनी या आर्थिक वर्षातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्याचा व  सेवा देण्याचा संकल्प केला आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم