टी.वाय.बी.सी.ए. सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Ahmednagar College | टी.वाय.बी.सी.ए. सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश




    Ahmednagar College | नगर : दर्शक ।: पुणे विद्यापीठाच्या अलीकडे घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष बी.सी.ए. (सायन्स) परीक्षेत अहमदनगर महाविद्यालयाच्या टी.वाय.बी.सी.ए. सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. विभागातील प्रथम चार विद्यार्थ्यांनी 90.9 गुण सरासरी मिळवून उच्च गुणवत्तेचा दर्जा सिद्ध केला.



     विद्यार्थ्यांमध्ये निकिता भांगे, जिया तुषार पाटील , आयेशा मतीन शेख व विवेक संतोष धावळे यांनी 90.9 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला.



  यावेळी प्राभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, शिस्तबद्ध अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणाचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.



     बी.पी.एच.इ. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. जे. बार्नबस यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले, आजच्या स्पर्धात्मक युगात तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रमात उत्तम यश मिळवणे ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे, तर शिक्षक, पालक आणि संपूर्ण संस्थेच्या प्रयत्नांचे फळ आहे. संस्थेच्या वतीने आम्ही अशा गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.



     कार्यक्रमास प्रोफेसर दिलीपकुमार भालसिंग आणि डॉ. सय्यद रज्जाक यांची उपस्थित होते.