विद्यार्थी केंद्रित उपक्रमांना चालना देणारा करार

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालय आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्यात सामंजस्य करार




नगर : दर्शक । 
अहमदनगर महाविद्यालय, नगर व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, कोल्हापूर यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. या करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नोएल पारगे आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.



या कराराच्या माध्यमातून ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत ग्लोबल गर्जे मराठी, करिअर संधींची महामेळावा यांसारख्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार असून, नवीन शैक्षणिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.


पुणे विभागातील करिअर कट्टा संलग्नित महाविद्यालयांची सहविचार सभा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पुणे येथे पार पडली. या सभेचे उद्घाटन यूजीसी एम.एम.टी.टी.सी.चे संचालक डॉ. संतोष केंद्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, अहिल्यानगर दक्षिणचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, नगर उत्तरचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, विभागीय समन्वयक डॉ. संजय खिल्लारे, प्राचार्य भाऊसाहेब देशमुख, जिल्हा समन्वयक प्रा. नवनाथ नागरे, तसेच डॉ. भागवत परकाळ यांची उपस्थिती होती.


अहमदनगर महाविद्यालयातील जिल्हास्तरावरील विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी अश्विनी ढोकणे आणि अर्जुन गहिले यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता. या करारामुळे विविध देशातील मराठी उद्योजकांचा मार्गदर्शन लाभ अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. भागवत परकाळ यांनी दिली.


या उपक्रमास भा.पां हिवाळे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जे. बार्नबस, उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, विनाअनुदान विभाग समन्वयक डॉ. सय्यद रज्जाक, उपप्राचार्य प्रीतमकुमार बेदरकर, रजिस्ट्रार कल्पलता भिंगारदिवे यांनी शुभेच्छा दिल्या.