Ahmednagar Day | अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त दुर्मीळ वस्तूंचे व गढ किल्ल्यांचे चित्र प्रदर्शन
नगर - अहमदनगर शहराच्या 535 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, इतिहास प्रेमी मंडळ व रहमत सुलतान फाउंडेशन तर्फे अहमदनगरचे नाणी संग्राहक सचिन डागा व 150 पेक्षा जास्त गढ किल्ल्यांची भ्रमंती करुन त्यांची उत्कृष्ट फोटोग्राफी करणारे ठाकुरदास परदेसी यांच्या फोटो प्रदर्शनाचे आयोजन
रविवार सोमवार दिनांक 25 व 26 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याचे मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी सांगितले.
सदर प्रदर्शनात जुने ऐतिहासिक नकाशे जूनी कागदपत्रे जुने समस्थानिक राजांची टिकटे पोस्टाची टिकीटे जुने कॉइंस निजामशाही शिव शाही ब्रिटिशकालीन जुन्या नोटा फैंसी नंबर्स नोटा नोटांची बंडली दुर्मिल वस्तु अशा अनेक महत्त्वाच्या संग्रहीत दुर्मिळ वस्तू प्रदर्शनात पहायला मिळतील.
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी या संधीचा सर्व नगरकरांनी व इतिहासप्रेमींनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन इतिहास प्रेमी मंडळ तर्फे आसिफ खान, अभिजित वाघ, युनूसभाई तांबटकर व भैरवनाथ वाकळे यांनी केले आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com