Dr.Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीतील मेकॅनिकल इंजिनिअर विभागातील 28 विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड
नगर : दर्शक । -
विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत मेकॅनिकल इंजिनिअर विभागातील विद्यार्थ्यांकरीता करीअर घडवण्याच्या दृष्टीने एकुण 7 कंपन्यांद्वारे चतुर्थ वर्ष मेकॅनिकल इंजिनिअर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तांत्रिक चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागातील एकुण 28 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
वैष्णवी अशोक शिंदे हिची पुणे येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक या कंपनीत निवड होऊन सर्वात मोठे पॅकेज मिळाले. याबाबत ती म्हणाली ही गोष्ट माझ्यासाठी गौरवास्पद आहे. त्याप्रमाणे डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया मधील मेकॅनिकल विभागासाठी अभिमानाची देखील बाब आहे. माझ्या यशामध्ये आई-वडील कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, प्लेसमेंट ऑफिसर यांचे मार्गदर्शन लाभल्याने मी यश मिळवू शकले.
पुणे येथील साऊथर्न ग्लोबल सर्विसेस, सी ए इ सोल्युशन, क्यू एच स्टालब्रो, ए पी टॉम तर अहिल्या नगर येथील वांबोरी मधील के एस बी पॅम्प, लेअर्स सोलर पी व्ही सिस्टीम या मेकॅनिकल क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सरासरी चार लाख आणि कमाल साडेसहा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तसेच नगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील संस्थेचे डायरेक्टर जनरल प्रशासन डॉ. पी.एम.गायकवाड, डायरेक्टर-टेक्निकल प्रा.सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ.उदय नाईक, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र नवथर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.सुदर्शन दिवटे विभागीय शिक्षक समन्वयक प्रा.दत्तात्रय नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com