Top News

Podar School | पोदार इंटरनॅशनल स्कूल, नगर शाळेची हॅट्रिक ; शंभर टक्के निकाल

  Podar School | पोदार इंटरनॅशनल स्कूल, नगर शाळेची हॅट्रिक ; शंभर टक्के निकाल

Podar School | पोदार इंटरनॅशनल स्कूल, नगर शाळेची हॅट्रिक ; शंभर टक्के निकाल


 

सलग तिसर्‍या वर्षीही सीबीएसई बोर्डाचा शंभर टक्के निकाल अनेक विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणी मिळवत केले घवघवीत यश संपादन



     नगर : दर्शक । पोदर इंटरनॅशनल स्कूल, नगर सीबीएसई बोर्डाचा सन 2024-25 या वर्षातील इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतील श्रुती बाळासाहेब देंडगे हिने 97.80% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तर प्रज्ञेश अमित बुचडे व अथर्व रणजीत पाटील या दोघांनी 96.60 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. 



सार्थक मुकेश दौड याने 96.40% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच समर्थ मुकेश दौड 96.20%, प्रणव मंगेश चौधरी 95.80% , जान्हवी बाळकृष्ण हनपुडेपाटील 95.20%, वेदांत नारायण शिंदे 95.00%, श्रेया साहेबराव डावरे 95.00%, श्रीहान हरिश्‍चंद्र शिंदे 94.80%, 



आशुतोष शिवशंकर वलांडे 91.00% या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष उज्वल यश संपादन केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी, विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगणक या सर्व विषयांमध्ये 90% च्या वर गुण मिळविले.



     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य मा. श्री. मंगेश जगताप सर यांनी अभिनंदन केले व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य मा. श्री. मंगेश जगताप सर, उपप्राचार्य शगुफ्ता काझी, शाळेचे सीनियर अँडमिन ऑफिसर आशुतोष नामदेव व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने