Savedi | बंसल क्लासेस उद्घाटन: सावेडीत दर्जेदार शिक्षणासाठी नवे दालन उघडले
Savedi | नगर : दर्शक । गुणवत्तेच्या शिक्षणासाठी ओळखली जाणारी ’बंसल क्लासेस’ संस्थेची नवी शाखा आता नगरच्या सावेडी परिसरात सुरू झाली आहे. प्रेम कॉर्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारंभात कर्नल संभाजी मोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी बोलताना कर्नल मोरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणे हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षण ही केवळ परीक्षा उत्तीर्ण करण्याची प्रक्रिया नसून, ती एक जबाबदार नागरिक घडवण्याची कार्यशाळा आहे. बंसल क्लासेससारख्या संस्थेमुळे ग्रामीण व निमशहरी भागातही दर्जेदार शिक्षण मिळू शकते, हे अत्यंत स्वागतार्ह आहे.
बंसल क्लासेस ही खखढ, छएएढ आणि चकढ-उएढ परीक्षांच्या तयारीसाठी भारतातील अग्रगण्य शिक्षण संस्था असून, कोटा (राजस्थान) येथून या संस्थेचा उदय झाला आहे. आता सावेडीत सुरू झालेल्या शाखेमुळे नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना दहावीत 90% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, त्यांच्यासाठी वर्ग शुल्क पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने ही सवलत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
या शाखेत तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवर्ग, वैयक्तिक मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, अद्ययावत अभ्यासक्रम, डिजिटल लर्निंग सुविधा, शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश करण्यात आला आहे.
उद्घाटनप्रसंगी ऋषिकेश दगडे, बाळासाहेब रास्ते, अभिषेक अवचार, सारिका भाकरे, शशिकांत दगडे, अनिता दगडे, प्रियंका चौधरी, मनीष नारंग, शोभना गायकवाड, प्रशांत दगडे, आशा दगडे, संजय मंडोरे, अनिल अवस्थी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com