Ahmednagar College |  आधुनिकतेकडे वाटचाल करणारा ऐतिहासिक क्षण

Ahmednagar College | बी.पी.हिवाळे शिक्षण संस्थेचा नवा लोगो आणि ब्रँडिंगचा भव्य शुभारंभ



नगर : दर्शक । 


बी. पी. हिवाळे एज्युकेशनल सोसायटीने आधुनिक युगाशी सुसंगत राहण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नव्या युगाच्या प्रारंभाचा नवा लोगो, पर्पज स्टेटमेंट आणि टॅगलाइन भव्य कार्यक्रमात लाँच केला. या कार्यक्रमातून संस्थेच्या ब्रँडिंगचा नवा अध्याय सुरू झाला आहे.





       “आजचं युग हे ब्रँडिंग, मार्केटिंग आणि ऍडव्हान्स टेकनॉलॉजीचं आहे. विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीचा अभ्यास करत, त्यांच्या गरजांवर आधारित ओळख निर्माण करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून विविध स्टाफ बैठका, चर्चासत्रं आणि संकल्पनात्मक काम करण्यात आलं. त्यातून हा लोगो तयार झाला आहे,” अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी श्री विशाल बार्नबस यांनी दिली. अखंड ३० मिनिटे जुन्या ते नवीन लोगो चे प्रवास आणि पुढील काळातील ब्रँड म्हणून BPHES हेच ओळख कशी तयार होणार याची पार्श्व भूमी आज इथे विशाल बार्नबस आणू हे दाखविले. 




      लोगो वापराची दिशा, स्टँडर्ड पॅटर्न आणि विविध संस्थांमध्ये एकसमानता राखण्याचं धोरण देखील स्पष्ट करण्यात आलं.




     या लोगोमधून संस्थेची ७८ वर्षांची प्रतिष्ठा, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि भविष्यातील व्हिजन स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. नवीन टॅगलाइन आणि पर्पज स्टेटमेंट संपूर्ण संस्थात्मक ओळख एकत्रित करत, एकता आणि उद्दिष्टसिद्धी यावर भर देतात.




      हा कार्यक्रम बी. पी. हिवाळे संस्थेच्या २० जून १९४७ रोजी स्थापन झालेल्या अहमदनगर महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने घेण्यात आला.



      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एन. एम. ऍस्टन (माजी प्राचार्य, वाडिया कॉलेज) होते.  संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जे. बार्नबस, डॉ. एस. बी. कोलते, संचालक मंडळ व सर्व शिक्षकवृंदांची उपस्थिति यामुळे कार्यक्रम आणखी विशेष ठरला.



      हा नवा लोगो केवळ एका डिझाईनपुरता मर्यादित न राहता, संस्था आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे जाणाऱ्या प्रवासाची दिशा दर्शवतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.