Top News

Nagar Award | मायबाप विद्यापीठ काव्यसंग्रहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार

Award | मायबाप विद्यापीठ काव्यसंग्रहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार





    Award |  नगर : दर्शक । - कवी सुभद्रासुत आंधळे (रा. केडगाव, अहमदनगर) लिखित मायबाप विद्यापीठ या वास्तववादी काव्यसंग्रहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पुणे येथे पार पडलेल्या विशेष समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.




     सन 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहाची निवड संत गाडगे महाराज विचार मंच, ओतूर आणि ज्ञानज्योत फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, मांजरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्धापन दिन विशेष कार्यक्रमात राज्यभरातून मागवलेल्या विविध साहित्यकृतींमधून करण्यात आली. यामध्ये काव्यप्रकारातील सुभद्रासुत आंधळे यांची निवड करण्यात आली.



     सन्मानप्रदान सोहळा पुण्यातील वेदशास्रोत्तेजक सभागृह, सदाशिव पेठ येथे शनिवार, दि. 7 जून 2025 रोजी संपन्न झाला. यावेळी कवी सुभद्रासुत आंधळे यांना त्यांच्या कन्या शितल आंधळे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि साहित्यप्रती प्रदान करून गौरवण्यात आले.




     या सोहळ्याचे संमेलनाध्यक्ष जग बदलणारा बापमाणूस या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत पडवळ उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन इंदू फार्मा, पुणेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांच्या हस्ते झाले.




     कवी सुभद्रासुत यांचा हा चौथा काव्यसंग्रह असून अष्टाक्षरी प्रकारातील आणि शॉपिझन डॉट ईन प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला आहे.




     कार्यक्रमाचे नियोजन संत गाडगे महाराज विचारमंचचे संस्थापक कार्याध्यक्ष रणजीत पवार, अध्यक्ष खं. र. माळवे, तसेच ज्ञानज्योत फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कविता काळे, कार्याध्यक्षा कांचन मून आणि मार्गदर्शक रघुनाथ कांबळे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.




     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाण्याचे प्रसिद्ध साहित्यिक संजय गवांदे यांनी केले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने