Ayyapa Temple | अय्यप्पा मंदिराचा १० जूनला प्रतीस्थापना महोत्सव


  


            


  Ayyapa Temple |  नगर - मधील सावेडीतील श्री आयप्पा मंदिराचा ३१ वा प्रतीस्थापना महोत्सव(वर्धापनदिन)रविवार  दि १० जून रोजी  साजरा होत असून त्यानिम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन  गुरुवार्याच्या उपस्थिती करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली.


 

            सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी,गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहेयास ३०वर्षे पूर्ण झाली असून वार्षिक वर्धापन दिनानिमीत पहाटे पासूनच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. 



यामध्ये महागणपती हवन,उषा पूजा,महामृत्युंजय हवन,कलश पूजा,कलश अभिषेकम,उच्च पूजा  तर संध्याकाळी भगवती सेवा,पुष्पा अभिषेक,अथर्झापूजा,हरी वरासम होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे.


 

              तरी सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे तसेच.श्री आयप्पा सेवा समितीच्या कलश पुजेस ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी व अन्नदानासाठी  मंदिरात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे