Top News

Bachat Gat Hudco Nagar | हडकोत बचत गटाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

 Bachat Gat | हडकोत बचत गटाच्यावतीने विविध कार्यक्रम संपन्न 

Bachat Gat | हडकोत  बचत गटाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न


Bachat Gat |   नगर : दर्शक । येथील प्रेमदान हडको येथील आवंती बचत गट व शार्वी  बचत गटाच्या वतीने आज विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष सुनीता वाल्हेकर यांनी दिली. 


            यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच महिलांना मार्गदर्शन व ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी अवंती बचत गटाच्या अध्यक्ष  सुनीता वाल्हेकर सचिव अर्चना भंडारी, शार्वी  बचत गटाच्या अध्यक्ष शोभा कानडे,सचिव  जयमला लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 


               यावेळी घेण्यात आलेल्या  स्पर्धेत प्रथम क्रमांक रेखा कानडे,द्वितीय क्रमांक अर्चना लोखंडे ,तृतीय क्रमांक शोभा पतंगे यांना मिळाला त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. 


            यावेळी वाल्हेकर म्हणाल्या की बचत गटातील महिलांनी बचत करणे व गुंतवणूक करणे व उद्योग व्यवसाय करणे एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता त्यांचे कुठेतरी मनोरंजन व्हावे,कौतुक व्हावे, आपली कला सादर करता यावी  यासाठी हा उपक्रम आम्ही या महिन्यापासून सुरू केला आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने