Damodar Biryani Dindi | दामोदर बिर्याणी हाऊसतर्फे आ जगताप हस्ते दिंडीचे स्वागत
येथील दामोदर बिर्याणी हाऊसतर्फे आ संग्राम जगताप यांच्या हस्ते विखारपहाड येथील योगी गुरु गोरक्षनाथ पायी दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी राजेंद्र ससे , निलेश म्हसे, संजयदास महाराज शिंदे, युवा कीर्तनकार अक्षय महाराज आहेर,
श्रीपाद दगडे, गणेश लबडे, अंकुश भगत, अजय दिघे, सचिन जगताप, किशोर वाळके, सचिन देवा पाठक, रामदास वाघ, दीपक खेडकर, शशिकांत भांबरे, यशराज ससे, अनिल कराळे, हेमंत रासने, जमीर शेख, बाबासाहेब शिरसाठ, यश कदम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हॉटेल दामोदर बिर्याणी हाऊस यांच्या वतीने आयोजित या स्वागत सोहळ्यात डफ, ताशा, लेझीम, फुलांची उधळण व महाप्रसाद यांच्या साक्षीने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.हिंदू संस्कृती, वारकरी परंपरा आणि भगव्या विचारांचे प्रतीक असलेल्या गोरक्षनाथ महाराजांच्या पायी दिंडीचे नगर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.
ही दिंडी केवळ एक धार्मिक सोहळा नसून, हिंदुत्व, सेवाभाव आणि वारकरी परंपरेचा सन्मान यांचा संगम ठरली. नगरकरांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला हजेरी लावली

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com