Dindi Nagar Vyapari | व्यापारी मंडळाकडून १७ हजार वारकर्यांना महाप्रसाद
नगर : दर्शक ।
नगरमध्ये आलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती महाराज आषाडी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीला मार्केटयार्ड व्यापारी मित्र मंडळच्या वतीने फराळ देण्यात आला गेली १३ वर्षे हा उपक्रम चालू आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमोल पोखरणा यांनी दिली.
मार्केटयार्ड मधील सर्व व्यापारी एकत्र येऊन वारकर्यांना आज एकादशी असल्याने फराळ देण्यात आला,यामध्ये साबुदाणा खिचडी, बटाटा चिवडा, लाडू,उपवासाची आमटी आदी होते.
त्याचा लाभ सुमारे १७ हजार च्या वर वारकर्यांनी घेतला. दुपारी १ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत फराळ वाटप चालू होते, यावर्षी प्रशासनाने उत्तम सहकार्य केले व खुप चांगली व्यवस्था ठेवली त्यामुळे सर्व व्यपाऱ्यानी मनपाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशश्वी करण्यासाठीसर्व मार्केट परिसरातील सर्व व्यापाऱयांनी परिश्रम घेतले

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com