ईद-उल-अजहा निमित्त ऑल इंडिया उलेमा बोर्ड ची सूचना बंदी असलेल्या प्राण्यांना कुर्बानीपासून टाळा- अंज़र खान
नगर : दर्शक । ईद-उल-अजहा निमित महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात ऑल इंडिया उलेमा बोर्डची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राज्यातील कायद्यांनुसार कुर्बानीसाठी योग्य व अयोग्य प्राण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी ऑल इंडिया उलेमा बोर्ड नॅशनल जनरल सेक्रेटरी अंज़र अन्वर खान, महाराष्ट्र स्टेट सेक्रेटरी मौलाना जहिर अब्बास कासमी,
जिल्हा अध्यक्ष परभणी मौलाना शेख जहांगीर नदवी, नांदेड़ ज़िला अध्यक्ष मुफ्ती शफीउद्दीन साहब, जालना ज़िला अध्यक्ष हाफिज हारून पठान ,प्रसिद्ध विधी तज्ञ ऑड. इम्तियाज अहमद खान, जाफर खान, मूसा खान, हाफिज आरिफ गुजराती, मुफ्ती कमर कासमी,
मुफ्ती आसिफ अलहाशमी, हाफिज अनीस रहमान अज़ीझी, मुहिब उर्दू, मुहम्मद अब्दुल बाकी, मौलाना अब्दुलकुद्दूस मिली, अर्शद खान, मुफ्ती शेख आलमगीर, हाफिज मुश्ताक फरकानी, हाफिज शेख आलमगीर, हाफिज रिझवान, हाफिज शुऐब, हाफिज अब्दुलहक, मौलाना रईस अहमद, मुहम्मद शुऐब आदीसह अनेक इमाम व उलेमा उपस्थित होते.
यावेळी उलेमांनी यावर भर दिला की, महाराष्ट्रत ज्या प्राण्यांची कुर्बानी कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे बंदी आहे. अशा प्राण्यांची कुर्बानी ही कायद्याचे उल्लंघन मानली जाईल व ज्यामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबही कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकू शकते.
त्यामुळे जनतेने अशाच प्राण्यांची कुर्बानी करावी, ज्यावर शासनाकडून कोणतीही बंदी नाही जसे की बकरा, बकरी, मेंढा, मेंढी व म्हैस इत्यादीची कुर्बानी करण्यात यावी व उपस्थितांनी सर्वांना आवाहन केले की, ईद-उल-अजहा साजरी करताना राज्यातील कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरी करावी व बंदी असलेल्या जनावरांना टाळावे असे आव्हान ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या वतीने करण्यात आले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com