Muslim Samaj Nivedan | मुस्लिम,ख्रिश्चन आणि अल्पसंख्यांक समाजाविरोधी आक्षेपार्ह वक्तव्य आणि दंगल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाईचे निवदेन
Muslim Samaj | नगर : दर्शक |
नगर शहरातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या वतीने नेहमी आणि नियमितपणे मुस्लिम लोकांना उद्देशून अत्यन्त खालच्या पातळीवर जाऊन अपशब्दांचा वापर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप करत आहे त्यांनी मुस्लिम समाजाला उच्चारलेल्या अपशब्दांचा निषेध नोंदवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी पंकज आशिया याना देण्यात आले.
शुक्रवार दिनांक २७ जून २०२५ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहून याठिकाणी निदर्शन करण्यात आले आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर तातडीने कडक कारवाईचे आदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष यांना मागणी निवेदन पाठविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
आमदार जगताप हे मुस्लिम,खिस्ती आणि सर्व अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात नियमितपणे अपशब्द वापरून या शहरात दंगल घडविण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत त्यांच्यावर कायद्याच्या देशात संविधानाने दिलेल्या अधिकाराने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com