Bhutkarvadi Nagar Dindi | भूतकरवाडीत हरिहर महाराज  पायी  दिंडीचे स्वागत 

Bhutkarvadi Nagar Dindi | भूतकरवाडीत हरिहर महाराज  पायी  दिंडीचे स्वागत




                नगर- इसळक-निबळक येथील कोटीलिंग तीर्थ येथून निघालेल्या सदगुरु  योगीराज महाराज हरिहर महाराज पायी दिंडी सोहळा  पंढरपूर आषाडी  दिंडीसाठी  निघाला असून आज नगरमध्ये भुतकरवाडी येथे  यादवराव खेडकर यांच्या येथे जेवणासाठी आगमन झाल्यावर माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.




यावेळी उपमहापौर अनिल बोरुडे,विलास ताठेरवींद्र बारस्कर,यादवराव खेडकरदत्तात्रय खेडकर,विनायक खेडकर आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्नेने उपस्थित होते.





 

         सदर दिंडी समर्थ सद‌गुरु हरिहर महाराज संस्थान व महादेव मंदिर ट्रस्ट.श्री क्षेत्र कोटीलिंग तिर्थ इसळक-निंबळक अहमदनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर असूण दिंडीचे ६० वे वर्ष आहेयावेळी डॉ जालिंदर महाराज निकम यांचे स्वागत करून तुळशी वृदावन धारक महिलाविणेकरीअश्व यांचे पाद्यपूजन करण्यात आलेयावेळी उपस्थित वारकरी  पांडुरंगाच्या गाण्यावर आनंदाने नाचले.



  

               दिंडी  नगर मधील भुतकरवाडी येथील यादवराव खेडकर यांच्या येथे  दुपारचे जेवण करून दिल्लीगेटला आली व नालेगाव तुन  माळीवाडा येथे मोकाटे यांच्या येथे मुक्कामी राहिली . द्वादशीला काल्याचा प्रसाद झाल्यानंतर दिंडी सोहळा विसर्जित होणार आहे. दिंडी सोहळाचा पंढरपूर येथील मुक्काम हरिहर महाराज संस्थान,बार्शी नगररोडशेगाव दुमला  ,पंढरपूर  येथे राहणार आहे.