Nagar Collector | ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Nagar Collector | ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू


 Nagar Collector |  नगर : दर्शक । 

 राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना दरमहा 5 हजार रुपये मानधन देण्याची योजना जाहीर केली आहे. १६ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ३१ जुलै २०२५ पर्यंत राज्य शासनाच्या https://aaplesarkar.gov.in या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे (दिव्यांगांसाठी ४० वर्षे), कला आणि साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे सातत्यपूर्ण, दर्जेदार योगदान असावे, ज्येष्ठ, विधवा, परित्यक्ता, आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येईल, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे, केवळ कलेवर अवलंबून असलेले किंवा सध्या इतर कोणतेही उत्पन्न नसलेले कलाकार या योजनेसाठी पात्र आहेत. 





केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर पेन्शन योजनेत समाविष्ट नसलेले आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेले कलाकार पात्र राहतील. या योजनेचा उद्देश कला आणि साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.