NH222 National Highway Camp | राष्ट्रीय महामार्ग नुकसान भरपाई रक्कम वाटपाबाबत अरणगांव येथे शिबीर संपन्न
NH222 National Highway Camp | नगर : दर्शक ।
राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 कल्याण,अहमदनगर ,नांदेड कि.मी. 211/00 ते 232/00 या रस्त्याच्या रुंदीकरण या सार्वजनिक प्रयोजना साठी संपादीत करणेत आलेल्या मौजे.अरणगांव, ता.जि.नगर येथील क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम वाटपाबाबत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,नगर यांच्या अध्येक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयअरणगांव येथे शिबिराचे आयोजन करणेत आले होते.
सदर अनुषंगाने संबधित खातेदार शेतकरी तसेच सरपंच पोपटराव पोपटराव पुंड ,राहुल कोळेकर तलाठी ,मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त रमेश जंगले,सर्कल मंडलाधिकारी वैशाली हिरवे ,सीमा जाधव महसूल सहाय्यक अधिकारी,केडगाव तलाठी श्री काळे,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
समस्या ,अडीअडचणी व काही व्यक्तिगत कारणातून संमती पत्रावर सह्या करत नाही,शासनाने जमीन घेतली परंतु अनेक लोक पैसे स्वीकारत नाही त्यासाठी आज ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर कॅम्प चे अनुषंगाने शासन आपले दारी या भूमीकेतुन राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 कल्याण अहमदनगर नांदेड कि.मी. 211/00 ते 232/00 या रस्त्याच्या रुंदीकरण या सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे. अरणगांव, ता.जि. अहिल्यानगर येथील संपादीत करणेत आलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम ज्या खातेदारांनी अदयाप स्विकारलेली नाही.
ज्या शेतक-यांचे आपआपसात मोबदला घेणेकामी एकमत होत नाहीत अथवा वाटपाबाबत काही अडचणी असल्यास अशा खातेदारांचे अडीअडचणी उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः जाणून घेतल्या . तसेच आपआपसातले वाद मिटवुन सदरची मोबदला रक्कम सहमतीने स्विकारणे बाबत सुचवुन तसे न झाल्यास सदरची रक्कम मा. न्यायालयात जमा करावी लागेल याबाबत सर्व उपस्थितांना माहिती दिली. सदर कॅम्प मध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित खातेदार यांनी मोबदला प्राप्त करुन घेणे कामी सकारात्मकता दाखवली.
प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्याना संबोधित करताना असे आवाहन केले की आपापसातील वादामुळे भूसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला असाच पडून राहिल्याने वेळे वाया जातो व शेतकऱ्यांचे नुकसान होते आपापसातील वाद समोपचाराने मिटवून घ्यावे असे ते म्हणाले यावेळी 12 पैकी ५ गटातील जमीन मालकांनी जागेवर मंजूर दिली यावेळी प्रांत अधिकाऱ्यांचा सत्कार गावच्या वतीने व बारा गटातील शेतकरी, ग्रामस्थांच्या वतीने सरपंच पोपटराव पुंड यांनी केला.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com