Nagar Manpa Dindi |  मनपा  वसाहत मध्ये आ संग्राम जगताप यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत


Nagar Manpa Dindi | मनपा वसाहतमध्ये आ संग्राम जगताप यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत

 

       


   नगर-श्री दत्त दिंडी सेवा मंडळ व दत्त प्रेरणा भजनी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ देवगाव,तालुका संगमनेर  आयोजित श्रीक्षेत्र देवगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आज नगरमध्ये मनपा  हडको वसाहत,आकाशवाणी केंद्र  येथे मोठ्या  उत्साहातआ संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती पूजा करून स्वागत करण्यात आले.





           प्रोफेसर चौकात सर्व वारकऱ्यांचे भगव्या टोप्या व उपरणे घालून स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने भाविक दिंडीत सहभागी झाले होते,दिंडी हडको वसाहतीत आल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दिंडीचे पूजन व महाआरती करण्यात आली.




 यावेळी युवा नेते योगेश सोनवणे,किशोर कानडेदत्तात्रय फटांगरे,राहुल साबळे,सचिन तनपुरे,द्वारकादास किंगर,भास्कर अकुबत्तीनं,सचिन महाजन,ज्ञानेश्वर  कानडे आदींसह परिसरातील मोठ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 



           आ.जगताप म्हणाले  वारकर्यांची सेवा केल्याने आत्मिक समाधान लाभते त्याच्यात आपण  प्रत्यक्ष देव पाहतो  आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.वारकरी  संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी  वारीमध्ये कोणी मोठा छोटा नसतो,मोठया संख्नेने  भाविक भक्त सहभागी होतात.व आपल्या शहरातून मोठ्या संख्नेने जातात हे आपले भाग्य आहे.



 

       दिंडीचा  मुक्काम हडकोतच होता या ठिकाणी रात्रीचा महाप्रसाद वारकऱ्यांना देण्यात आला सकाळी नाष्ट्यानंतर दिंडी पुढे मार्गस्थ झाली